22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीत फूटीच्या चर्चेला अर्थ नाही

महाविकास आघाडीत फूटीच्या चर्चेला अर्थ नाही

एकमत ऑनलाईन

बारामती : शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार अशा चर्चा सुरु असतील तर अशा प्रकारच्या चर्चेला अर्थ नसतो. जोपर्यंत शरद पवार सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीला आशीर्वाद आहेत. तोपर्यंत यात फुट पडणार नाही किंवा महाविकास आघाडीतील लोकांना अडचणदेखील नाही, असे स्पष्टीकरण देत त्यांनी महाविकास आघाडीत फूट पडणार का? या चर्चेचा विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. ते बारामतीत बोलत होते.

महाविकास आघाडीच्या आमदारांच्या कामाला स्थगिती दिली आहे. मात्र त्यात देखील काही प्रमाणात स्थगिती उठलेली आहे. त्यात उड्डाणपुलांचा देखील समावेश आहे. व्हाईट बुकमध्ये विधिमंडळाची मान्यता मिळाली आहे. सभागृहाची मान्यता मिळाली आहे, अशा वेळेस ती काम थांबवणं उचित नाही. तुम्ही तुमची नवीन कामे मंजूर करा, त्या कामाला गती द्या, यामध्ये दुमत असायचे काही कारण नाही, असे त्यांनी म्हटले आहे. १४५ आमदारांचा पाठिंबा मिळवतो तो सरकार स्थापन करतात हे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी आपणच कायमचा राहणार आहोत असे समजू नये आणि तशी विरोधकांना वागणूक देऊ नये असे त्यांंनी खडसावले.

अमोल कोल्हे आणि मी संपर्कात
अमोल कोल्हेंचे यादीतून नाव वगळण्यात आले आहे. यासंदर्भात मला फार माहिती नाही. त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु आहे. मात्र माझे आणि त्यांच्या कायम संपर्क सुरु आहे. ते नाराज आहेत का? किंवा काय नेमके प्रकरण आहे हे लवकरच सांगू असे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या