मुंबई : तब्बल सात वर्षांनंतर वादग्रस्त क्रिकेट बुकी अनिल जयंिसघानी याला आज मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखाने अटक केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फरार असणारा अनिल जयंिसघानी याला अटक करण्यासाठी विशेष ऑपरेशन राबवण्यात आले होते. अटक करायला गेल्यानंतर जयसिंघानी याने पोलिसांवर कुत्रा सोडला होता आणि तिथून पळाला होता. तसेच तब्बल तीन वेळा पोलिस पोहोचायच्या आतच तो फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
जयसिंघानी इंटरनेटचा वापर करून अनेकांच्या संपर्कात होता अशी माहिती पोलिसांना होती. तो वापरात असलेले मोबाईल फोन आणि इतर काही तांत्रिक वस्तू पोलिसांनी जप्त केली असून तो कोणकोणत्या राजकीय नेत्यांच्या आणि पोलीस अधिकारांच्या संपर्कात होता यांची माहिती घेण्याचं काम सुरु आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलने रविवारी रात्री ११ .४५ वाजता गुजरातमधील गोध्रा सीमेवरून त्याला अटक केली. त्याच्यासोबत त्याचा नातेवाईक आणि ड्रायव्हरलाही अटक केली असून कार ताब्यात घेण्यात आली आहे.
जवळपास तीन वेगवेगळ्या ठिकाणी, पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी तीन मिनिटे तो निघून गेला. पोलीस आपल्या पाठीमागे असल्याची त्याला जाणीव होती आणि ते सतत पळत होते. त्याच्यासोबत वेगवेगळ्या कंपन्यांचे डिव्हाइसेस आणि इंटरनेट वापरण्यासाठी असणारी विविध यंत्रणाही जप्त करण्यात आली आहे.