मुंबई : राज्यातील २५ जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातील परिपत्रक काढून माहिती दिली आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभमीवर जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेत बदल केला होता. तर जिल्हापरिषदेतील वाढीव गट आणि गणात देखील बदल करण्यात आले होते. त्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा राबवण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी उलटणार असून त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या स्थगितीनंतर आता या निवडणुका पुढच्या वर्षी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.