22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यातील २८१ कृषि उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील २८१ कृषि उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणुकीस पात्र २८१ कृषि उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असे प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३ ला आणि मतमोजणी ३० रोजी होणार आहे.

प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीकरिता बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषि पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांचे सदस्य मतदार असल्यामुळे या सदस्यांची सूची २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आदेश संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गटविकास अधिकारी यांना दिले आहेत.

बाजार क्षेत्रातील परवानाधारक व्यापारी, आडते व हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार असल्यामुळे या मतदारांची यादी १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करावी लागणार आहे. कृषि उत्पन्न बाजार समित्यांची प्रारूप मतदारयादी १४ नोव्हेंबर रोजी आणि अंतिम मतदारयादी ७ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३ रोजी व मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथे याचिका दाखल झालेल्या असताना उच्च न्यायालयाने श्रीरामपूर, राहता, जाफ्राबाद, भोकरदन, वसमत व धारूर या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया विनिर्दिष्ट कालावधीत पूर्ण करण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार प्राधिकरणाने या बाजार समित्यांच्या निवडणुका २ सप्टेंबर २०२२ रोजीच्या आदेशानुसार सुरू केलेल्या आहेत. या बाजार समित्यांचे मतदान व मतमोजणी अनुक्रमे १८ डिसेंबर व १९ डिसेंबर २०२२ रोजी होणार असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली आहे.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गटविकास अधिकारी यांच्याकडून सदस्य सूची मागवणे- २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत, प्रारूप मतदारयादी तयार करण्याकरिता सदस्य सूची बाजार समिती सचिवाकडे सुपुर्द करणे- ३ ऑक्टोबर २०२२, बाजार समिती सचिवाने नमुना ४ मध्ये प्रारूप मतदारयादी तयार करणे- ३ ते ३१ ऑक्टोबर २०२२, बाजार समिती सचिवाने नमुना ४ मधील प्रारूप मतदारयादी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करणे- १ नोव्हेंबर २०२२, जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ. उ. बा. स.) यांनी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करणे- १४ नोव्हेंबर २०२२, प्रारूप मतदारयादीवर आक्षेप/ हरकती मागवणे

– १४ ते २३ नोव्हेंबर, प्राप्त आक्षेप/हरकतींवर निर्णय घेणे- २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करणे- ७ डिसेंबर २०२२, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे- २३ डिसेंबर २०२२, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी- २३ ते २९ डिसेंबर २०२२, नामनिर्देशनपत्रांच्या छाननीचा दिनांक- ३० डिसेंबर २०२२, छाननीनंतर वैध नामनिर्देशनपत्रांच्या प्रसिद्धीचा दिनांक- २ जानेवारी २०२३, उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी- २ ते १६ जानेवारी २०२३, निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा व निशाणी वाटप करण्याचा दिनांक- १७ जानेवारी २०२३, मतदान- २९ जानेवारी रोजी आणि मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी. मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या