23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईतील प्रसिद्ध यूट्यूबर निघाला अट्टल गुन्हेगार

मुंबईतील प्रसिद्ध यूट्यूबर निघाला अट्टल गुन्हेगार

एकमत ऑनलाईन

मुंबई : कुर्ला येथील विनोबा भावे नगर पोलिसांनी घरफोडी प्रकरणी अभिनव अर्जुन गुप्ता या २६ वर्षीय तरुणाला अटक केली. अभिनव हा प्रसिद्ध यूट्यूबर असून त्याचे हजारो फॉलोअर्स असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये घरफोडीच्या चार गुन्ह्यांत अभिनव याचा सहभाग आढळला आहे.

कुर्ला पश्चिमेकडील एका घरातून चोरांनी २५ तोळे सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदी चोरून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पद्माकर पाटील यांच्यासह काशिद, शिंदे, देवळे, निळे, किरण पाटील, इंगळे यांच्या पथकाने तपास सुरू केला. कुर्ला परिसरातील सुमारे १५० सीसीटीव्ही फुटेजची झाडाझडती घेण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या संशयास्पद व्यक्तींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले.

मिळालेल्या माहितीवरून नेहरू नगर, वाकोला, दिवा येथे पाटील यांच्या पथकाने संशयास्पद व्यक्तीचा शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. या तरुणाचा वावर याच परिसरात अधिक दिसत असल्याने पोलिसांनी त्याचा माग कायम ठेवला आणि कुर्ला परिसरातच अभिनव गुप्ता हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

पोलिसांनी अंगझडती तसेच अभिनवच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे घरफोडीची हत्यारे, चोरलेली दीड किलो चांदी, १४ मोबाईल हॅण्डसेट, विदेशी चलनी नोटा, दोन लॅपटॉप, बनावट दागिने तसेच इतर साहित्य सापडले. चौकशीमध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर आली. अभिनव हा यूट्यूबवर प्रसिद्ध असून त्याचे हजारो फॉलोअर्स आहेत. असे असतानाही त्याने गुन्हे का केले? याबाबत पोलिस चौकशी करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या