26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeमहाराष्ट्रस्वदेशी लसीचा दिला पहिला डोस

स्वदेशी लसीचा दिला पहिला डोस

एकमत ऑनलाईन

भारतात विकसित लसीची मानवी चाचणी सुरू

नवी दिल्ली : भारतात विकसित करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचणीस एम्स रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे. ३० वर्षीय स्वयंसेवकाला या स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. या स्वयंसेवकाला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी कोव्हॅक्सिन ही कोरोना विषाणूवरील लस तयार केली आहे.

स्वयंसेवकाला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर घरी पाठवण्यात येणार आहे. यानंतर पुढील सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवले जाईल. कोव्हॅक्सिन लसीचा हा पहिलाच डोस आहे. डोस देण्याआधी करण्यात आलेल्या स्क्रिनिंग आणि टेस्टमध्ये संबंधित ३० वर्षीय व्यक्ती पात्र ठरली होती. मानवी चाचणी कर-ण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी तयारी दर्शवली होती. त्यातून या व्यक्तीची निवड करण्यात आली. कोव्हॅक्सिन लस हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंपनीकडून तयार केली जात असून यासाठी त्यांनी आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वायरॉलॉजी यांच्याशी हातमिळवणी केली आहे.

नुकतेच त्यांना केंद्रीय औषध नियंत्रण विभागाकडून (डीसीजीआय) मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली होती.
पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी निरोगी आणि सदृढ व्यक्तींची निवड केली जाणार असून यामध्ये १८ ते ५५ वयोगटातील व्यक्ती असणार आहेत. यामध्ये गर्भवती नसणा-या महिलांचाही समावेश असणार आहे. चाचणीसाठी तयार झालेल्या उमेदवारांना या लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर १४ दिवसांनी पुढचा डोस देण्यात येणार आहे.

कोव्हॅक्सिनच्या वैद्यकीय चाचणीसाठी आयसीएमआरने देशभरात निवडलेल्या १२ ठिकाणांपैकी दिल्लीतील एम्स हे एक ठिकाण आहे. दुसºया टप्प्यात सर्व १२ ठिकाणांवरील एकूण ७५० जणांवर लसीची चाचणी केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात ३७५ जणांवर प्रयोग पहिल्या टप्प्यात ३७५ जणांवर या लसीचा प्रयोग केला जाणार आहे. यामध्ये एम्स रुग्णालयातील १०० जण असणार आहेत. एम्सच्या एथिक्स कमिटीकडून चाचणीला मंजुरी मिळाल्यानंतर स्वयंसेवक बनण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर काही तासांतच एक हजारापेक्षा जास्त जणांनी स्वयंसेवक बनण्यासाठी संपर्क साधला होता.

Read More  लातूर जिल्ह्यात आणखी ६९ रुग्णांची भर

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या