इंदापूर : दोन वर्षानंतर प्रथमच झालेल्या या रिंगण सोहळ्यात वारक-यांमध्ये उत्साह दिसून आला. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण पार पडले. पालखीला अगोदर प्रथम झेंडेकरी नंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी, त्यानंतर विणेकरी यानंतर मानाच्या पालखी बरोबर असणा-या अश्वाने रिंगणाच्या तीन फे-या केल्या .
महाराजांचा जयघोष करीत वारक-यांनी पहिले गोल ंिरगण केले. हा नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लाखो भाविकानी गर्दी केली होती. बेलवाडीमध्ये तुकारामाच्या पालखीचं चौथा मुक्काम आहे. यापूर्वीही संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात काटेवाडी येथेही वैशिष्ट्यपूर्ण असे मेंढ्याचे रिंगण पार पडले.