18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढला

राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढला

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. हवामान विभागने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रात्रभर मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

तसेच राज्यातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, हिंगोली, वाशिम, पालघर, यवतमाळ, लातूर या जिल्ह्यांना देखील पावसाने झोडपून काढले आहे. दरम्यान आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज संपूर्ण राज्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. येत्या चार ते पाच दिवसात राज्यात गडगडाटासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मुंबई पावसाची जोरदार हजेरी, सखल भागात पाणी
मुंबई आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. रात्रभर देखील पावसानं जोरदार हजेरी लावली, पुन्हा सकाळपासून पाऊस सुरु आहे. मुंबईसह, ठाणे, डोंबिवली आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला. मुंबईतील हिंदमाता परिसरात पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

तसेच अंधेरी सबवे वर २ फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहतुकीची गती मंदावली आहे. सिरी रोड पेट्रोल पंपाजवळ वाळकेश्वर रस्त्यावर १.०५ फूट पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. दरम्यान, आज मुंबईमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढचे काही दिवस पावसाच्या मध्यम किंवा हलक्या सरी बरसणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

शेतक-यांची चिंता वाढली
राज्यातील विविध जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. विजांच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका शेतक-यांना बसला आहे, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि कापसाला मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी सोयाबीनची काढणी झाली होती, तर काही ठिकाणी सोयाबीन काढायचे बाकी होते, अशा स्थितीत पाऊस आल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या