23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रफॉर्म्यूला ठरला? शिंदे गटाला १६, भाजपला २५ मंत्रिपदे मिळणार?

फॉर्म्यूला ठरला? शिंदे गटाला १६, भाजपला २५ मंत्रिपदे मिळणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये सहमती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, त्यानुसार मंत्रिपदाचा फॉर्म्यूला ठरला आहे. त्यात भाजपला २५, तर शिंदे गटाला १६ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच अपक्ष आमदारांनादेखील मंत्रिपदे दिली जाणार आहेत.

राज्यात ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दोन्ही नेत्यांच्या शपथविधीला एक महिना पूर्ण होत असतानादेखील मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, यामुळे विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चित होत नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी रात्री दिल्लीत शिंदे गटाचे अब्दुल सत्तार आणि भाजपचे गिरीश महाजन दिल्लीत दाखल झाले होते. त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली असून, या चर्चेत मंत्रिपदाचा फॉर्म्यूला ठरला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

भाजपकडे अपक्षांसह ११३ आमदारांचे पाठबळ आहे, तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत ५० आमदार आहेत. राज्य सरकार स्थापन होऊनदेखील मंत्रिमंडळ विस्तारात दोन्ही गटांना किती पदे मिळणार याबाबत साशंकता होती. मात्र, भाजपला २४ ते २५ मंत्रिपदे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला १५ ते १६ मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

अपक्षांना मंत्रिपद मिळणार
एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा देणा-या अपक्षांनादेखील मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ८ ते ९ अपक्ष आमदार आहेत, तर भाजपसोबतदेखील ५ ते ६ अपक्ष आमदार आहेत.

त्या मंत्र्यांना पुन्हा संधी?
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या ९ मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे यांच्यासह संदिपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, बच्चू कडू, राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात भूमिका घेतली होती. या नेत्यांना शिंदे गटातून पुन्हा संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे. तसेच अन्य समर्थक आमदारांनीही मंत्रिपदासाठी दावेदारी सांगितली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या