17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रदिवाळीत फुलांचा 'सुगंध' महागणार

दिवाळीत फुलांचा ‘सुगंध’ महागणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : सध्या देशात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. काही ठिकाणी तर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. दरम्यान, यावर्षी देशाच्या विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. तर काही राज्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. फुल शेतीवर देखील या अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या फुल उत्पादक शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सध्या बाजारात फुलांची आवक कमी होत आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक राज्यांमध्ये पिकांचे तसेच बागायती शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. वातावरणातील बदल आणि अतिवृष्टीचा फुल शेतीवर परिणाम झाले आहे. फुलांच्या उत्पादनात घट आली आहे. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात मोठया प्रमाणावर फुल शेती केली जाते. परंतू यंदा पावसामुळे फुलांचे पीक जवळपास नष्ट झाले आहे. त्यामुळे मंडईत फुलांची आवकही बरीच कमी झाली आहे. तर दुसरीकडे कपश्चिम बंगालमध्येही फुलांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

महाराष्ट्र हे फुल शेतीचे केंद्र
महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी आता पारंपारिक पिकांबरोबरच फळबागांचे उत्पादन वाढवण्यावर भर देत आहेत. त्याच धर्तीवर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा, अकोळनेर, वासुंदे, खडकवाडी परिसरात पावसाच्या सरी पडल्याने फुलांच्या पिकांवर काळे डाग पडले आहेत. काही शेतात फुले आतून कुजली आहेत. या समस्या पाहता आता शेतकरी संकटात सापडला आहे.

आवक ४० टक्क्यांनी घटली
फुल शेती पिकांवर वाईट परिणाम झाल्याने बाजारात फुलांची आवकही ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे फुलांचे भाव गगनाला भिडले आहेत. आता बाजारात पांढ-या शेवंतीला प्रति किलोला २०० रुपयांचा दर मिळत आहे. तसेच झेंडूला किलोला ६० ते ८० रुपयांचा दर मिळत आहे. मात्र, पावसाचा फटका फुल शेतीला बसल्यामुळे शेतक-यांकडे विकण्यासाठी मोठया प्रमाणात फुले नाही आहेत. परिणामी बाजारात आवक कमी आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतक-यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

शेतकरी संकटात
दरम्यान, यावेळी सणासुदीच्या काळात फुलांची पिके वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. एप्रिलमध्ये लागवड केलेले पीक ऑक्टोबरपर्यंत खराब झाले आहे. या महिन्यात फुलांच्या काढणीला सुरुवात होत असते. कारण या दोन महिन्यात मोठे सण असतात. याचा फायदा फुल उत्पादक शेतक-यांना होत असतो. मात्र, आता फुल उत्पादकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या