23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeमहाराष्ट्रशासन नेहमीच शेतक-यांसोबत

शासन नेहमीच शेतक-यांसोबत

एकमत ऑनलाईन

अकोला : अतिवृष्टीमुळे झालेले शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत देणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात पंचनामे करण्याचे काम सुरु असून शासन हे नेहमीच शेतक-यांसोबत आहे. शेतक-यांना मदत देण्यासंदर्भात लवकरच मंत्रीमंडळ स्तरावर निर्णय होईल,असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी रविवारी (दि.२५ )आढावा बैठकीत स्पष्ट केले.

ज्या ज्या शेतक-यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे संरक्षण घेतले आहे, त्यांनी आपल्या नुकसानीची माहिती तातडीने विमा कंपनीला द्यावी, शिवाय शासकीय अधिकारी कर्मचारी यांनीही विमाधारक नुकसानग्रस्त शेतक-यांची माहिती गोळा करुन विमा कंपनीला द्यावी, याबाबत पुढाकार घेऊन काम करावे,असे स्पष्ट निर्देशही मंत्री भुसे यांनी दिले. अकोला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले, त्याची पाहणी करण्यासाठी आज कृषीमंत्री भुसे हे जिल्हा दौ-यावर आले होते. त्यांनी यासंदर्भात येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन प्रशासनाला निर्देश दिले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. खोत यांनी माहिती दिली की, जिल्ह्यात ४ लाख ६४ हजार २२२ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. एकूण ९६ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. जिल्ह्यातील ५२ मंडळांपैकी ३५ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. ७३१९ हेक्टर जमीन वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर सुमारे ५५ हजार हेक्टर क्षेत्र हे अतिवृष्टीने बाधीत होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात १ लाख ९० हजार शेतक-यांनी प्रधानमंत्री पिक विम्याचे संरक्षण घेतले आहे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

कृषीमंत्री भुसे म्हणाले की, नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे. या नुकसानीचे पंचनामे महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभाग यांनी संयुक्तपणे करावे. पिक विमाधारक शेतक-यांचे जर नुकसान झाले असेल तर त्यांची माहिती तात्काळ विमा कंपन्यांना कळवावी. यासाठी शासकीय विभागांनी पुढाकार घ्यावा. जर विमा कंपनीची वेबसाईट बंद असेल तर तहसिल कार्यालयात, कृषी विभागाला अथवा ज्या बँकेत पिक विम्याची रक्कम भरली असेल त्या बँकेत अर्ज दिला तरी तो अर्ज पिक विमा कंपनीलाच दिला असे ग्रा मानले जाईल,असे स्पष्ट केले. विमाधारक शेतक-यांचे जर नुकसान झाले असेल तर त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी विभागांनी स्वत:हून मोहिम राबवून शेतक-यांना भरपाई द्यावी.

कारगिल युद्धावेळी इस्त्रायलची भारताला सर्वात मोठी मदत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या