25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रपक्ष फोडण्यात सरकार व्यस्त

पक्ष फोडण्यात सरकार व्यस्त

एकमत ऑनलाईन

बारामती : शिंदे-फडणवीस सरकार हे अतिशय असंवेदनशील असं ईडीचे सरकार आहे. पक्ष फोडणे, लोकांना दमदाटी करणे यात ते एवढे व्यस्त आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि त्यातून शेतक-यांचे प्रश्न त्यांना समजत नाहीत. त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. अडचणीच्या काळातील शेतक-यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी स्वत: अजित पवार देखील बोलले होते.

आज अजितदादांनी शेतक-यांचा विषय काढला आणि आज चर्चा होणार होती. यामध्ये आमची सगळ्यांची अपेक्षा होती की महाराष्ट्र सरकारने शेतक-यांसाठी काहीतरी मदत करावी परंतु या सरकारवर शेतक-यांचा विश्वासच नसल्यामुळे या शेतक-याने असे टोकाचे पाऊल उचललेले असावे. या सगळयाला हे ईडीचे सरकार जबाबदार असून पक्ष फोडून ५० कोटी त्या लोकांच्या घरात जाण्यापेक्षा हे पैसे कष्ट करणा-या शेतक-यांना दिले असते. कष्ट करणा-या शेतक-यांना दिले असते तर ते चालले असते असा टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. त्या बारामतीत बोलत होत्या.

अर्थमंत्री येत असतील तर उत्तमच
एक पक्ष एक देश याच्या आम्ही जास्त विरोधात आहे. जास्त लोक बारामतीत लक्ष घालत असतील तर काही तरी विशेष असेल ना बारामतीत. भारताचे अर्थ मंत्री येत असतील तर चांगली गोष्ट आहे. जर मी तिथे असेल तर त्यांचे स्वागत करेल. प्रत्येकाला बारामतीत यावे वाटत कारण काहितरी विशेष असेल ना? असे म्हणत त्यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला.

राज्यातील कामांना ब्रेक
सत्ता पाडण्यात जेवढी घाई केली. ते करताना दुस-या राज्याची मदत घेतली. राज्यात वेगात काम चालली होती पण अचानक ब्रेक लागला. पालकमंत्री नसल्याने अनेक काम रखडली गेली. जनतेच्या हिताची काम रखडली गेलीत. अनेक निर्णय बदलत आहेत असे काय झाले की घेतलेले निर्णय हे बदलत आहेत. सत्ता बदलली की विचार बदलायचे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या