22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रकोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्­या विद्यार्थ्यांची फी शासन भरणार !

कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्­या विद्यार्थ्यांची फी शासन भरणार !

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा सध्या सुरू असणा-या मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा इतर कोणत्­याही अभ्­यासक्रमाची संपूर्ण फी तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत राज्य शासन भरेल. त्यासाठी कोणताही वेगळा निर्णय करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.

कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याच्या निर्णयाबद्दल शासनाने काय पावले उचलली, याबाबत शिरीष चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण फी माफ करण्याबाबत सर्व अकृषी विद्यापीठांना निर्देश देण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

आतापर्यंत ९३१ पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी, २०० पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी आणि २२८ पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी यांना २ कोटी ७६ लाख ८४ हजार एवढी रक्कम वितरीत करण्यात आली असल्याची माहिती पाटील यांनी दिली. त्यामुळे ज्यांचे दोन्ही पालक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले, अशा शिक्षण घेणा-या मुलांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या