18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यपाल तर ‘महामहिम’ त्यांच्याबद्दल बोलणार नाही

राज्यपाल तर ‘महामहिम’ त्यांच्याबद्दल बोलणार नाही

एकमत ऑनलाईन

पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून सेवा आणि समर्पण अभियानाचे आयोजन करमुक्त आले आहे. त्याच निमित्ताने कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

सायकल रॅलीच्या कार्यक्रमाप्रसंगी एका महिला सायकल पटूचा राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी फोटो काढत असताना, राज्यपालांनी त्या महिलेच्या तोंडावरचा चक्क मास्क स्वत:च्या हाताने काढला. यावर अजित पवारांनी सूचक वक्तव्य केले आहे. पुण्यात कोरोना आढावा बैठकीत पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

‘राज्यपाल महामहिम आहेत. मी त्यांच्याबद्दल बोलणे उचित नसल्याचे अजितदादा म्हणाले आहेत.ते आम्हाला शपथ देतात, तो त्यांचा अधिकार असतो. त्यांच्या अधिकारावर बोलण योग्य नाही. म्हणून अजित पवारांनी त्यांच्याविषयी बोलणे टाळले आहे.’
केंद्र आणि राज्य सरकारने करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असताना. थेट राज्यपालांनी एका महिलेचा मास्क खाली घेतल्याने, यामुळे एकच चर्चा रंगली आहे.

पुण्यात खेळाडूंसाठी स्वामिंग टँक ओपन
पुण्यात खेळाडूंसाठी स्विमिंग टॅक ओपन करण्याची परवानगी दिली आहे. फक्त लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या खेळाडूंनी टॅक मध्ये जाण्याची परवानगी असणार आहे. सिंहगड परिसराचा विकास आराखडा तयार असून ग्राउंड फ्लोअरची पोलीस चौकी, किल्ल्याला शोभेल असे दगडी काम आणि त्या बांधकामाची चौकी उभारण्यात येणार आहे. पीएमपीएमएलच्या प्रायोगिक तत्वावर ई वेहिकल सुरू करणार आहे. पायथ्यापासून वर जाण्यासाठी या वाहनांचा उपयोग होईल.

पुण्यात सर्व दुकानं बंद राहणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. अनंत चतुर्दशीला पुणे, पिंपरी – चिंचवड शहरातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत. दिवसभर हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु राहणार आहेत, तसेच औषधांची दुकाने आणि दवाखाने सुरु राहतील असही ते म्हणाले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या