28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यपालांचा उद्देश शिवरायांचा अपमान करण्याचा नसेल

राज्यपालांचा उद्देश शिवरायांचा अपमान करण्याचा नसेल

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याविरोधात राज्याभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. ट्विटमद्धे संजय कुटे म्हणतात की, आम्ही राज्यपालांच्या या वक्तव्याशी कदापि सहमत नसून तीव्र शब्दात याचा निषेध करीत आहोत असे म्हटले आहे. तर, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मात्र राज्यपालांची बाजू घेतल्याचे दिसून येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राजकीय स्तरातून टीका करण्यात येत आहे. दरम्यान अशातच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ५ वेळा औरंगजेबाला पत्र लिहून माफी मागितली, असे म्हणत सुधांशू त्रिवेदींनी म्हटले आहे. यावर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. विरोधकांकडून सत्ताधा-यावर टीका होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या