24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा राज्यात उत्साह

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा राज्यात उत्साह

एकमत ऑनलाईन

मुंबई : आज १४ एप्रिल २०२२ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती. पिढ्यान्पिढ्या जातीपातीच्या जोखडात अडकलेल्या, सगळ्याच पातळींवर मागास राहिलेल्या पददलित समाजाला त्याच्यावरच्या अन्यायाची जाणीव करून देत, संघर्ष करण्यासाठी उभे राहण्याची प्रेरणा देण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अजोड आहे.

त्यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईतील चैत्यभूमीवर या महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला आहे. दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज सकाळपासूनच इथे भीमसागर लोटला आहे.

दरम्यान, डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर दाखल झाले तसेच त्यांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या