24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रजे ज्या जिल्ह्यात ध्वजारोहण करतील ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री?

जे ज्या जिल्ह्यात ध्वजारोहण करतील ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री?

एकमत ऑनलाईन

मुंबई : विरोधकांच्या दबावानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला पण अद्याप खाते वाटप जाहीर झालेले नाही. पण येत्या स्वांतत्र्यदिनासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी सरकारी ध्वजारोहण कार्यक्रम जाहीर झाला असून यासाठी मंत्र्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरुन आता ही यादी म्हणजेच पालकमंत्रीपदांची यादी असल्याची चर्चा सुरु आहे.

१५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी १९ जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण कोण करणार? याची यादी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरात, सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरात, चंद्रकांत पाटील पुण्यात ध्वजारोहण करतील. त्यामुळे जे मंत्री ज्या जिल्ह्यात ध्वजारोहण करतील तेच त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १९ जिल्ह्यांव्यतिरिक्त जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी ध्वाजारोहण करणार आहेत.

अशी आहे यादी
१) नागपूर – देवेंद्र फडणवीस
२) पुणे – चंद्रकांत पाटील
३) चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
४) अहमदनगर – राधाकृष्ण विखे-पाटील
५) नाशिक – गिरीश महाजन
६) धुळे – दादा भुसे
७) जळगाव – गुलाबराव पाटील
८) ठाणे – रंिवद्र चव्हाण
९) मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा
१०) सिंधुदुर्ग – दीपक केसरकर
११) रत्नागिरी – उदय सामंत
१२) परभणी- अतुल सावे
१३) औरंगाबाद – संदीपान भुमरे
१४) सांगली – सुरेश खाडे
१५) नंदुरबार – विजयकुमार गावित
१६) उस्मानाबाद – तानाजी सावंत
१७) सातारा – शंभुराज देसाई
१८) अब्दुल सत्तार – जालना
१९) यवतमाळ – संजय राठोड

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या