26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeमहाराष्ट्र‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने जेजुरी दुमदुमली

‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने जेजुरी दुमदुमली

एकमत ऑनलाईन

पुणे : पुणे जिल्ह्यात अनेक रहस्यमय मंदिरे आहेत. त्यात जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिराचा देखील समावेश आहे. यळकोट यळकोट जय मल्हार म्हणत अनेक भाविक या मंदिराच्या दर्शनाला येतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी या मंदिरात लाखोंच्या संख्येनं भाविक येतात. उत्सव साजरा करतात. मात्र याच मंदिरात राक्षस मल्लाचा वधही झाला होता.

याची अनेकांना माहिती नाही. मंदिराच्या आवारात भंडा-याला विशेष महत्व आहे. या भंडा-यामुळे या मंदिराला सोन्याची जेजुरीसुद्धा संबोधलं जातं. हे सुंदर मंदिर ७१८ मीटर उंचीवर टेकडीवर बांधले आहे. मंदिरात दर्शनासाठी भाविकांना सुमारे दोनशे पाय-या चढून जावे लागते.

हे मंदिर खंडोबाला समर्पित आहे. ज्यांना मार्तंड भैरव आणि मल्हारी या नावानेही ओळखले जाते. हे देखील भगवान शिवाचे दुसरे रूप आहे. मंदिरात स्थापित केलेली खंडोबाची मूर्ती घोड्यावर स्वार झालेल्या योद्ध्याच्या रूपात आहे. त्यामुळे ही आकर्षक मुर्ती अनेकांचं लक्ष वेधून घेते. याच मंदिरात राक्षस मल्लाचा वध करण्यात आला होता. मल्लाचे शीर कापून मंदिराच्या पायरीवर ठेवले होते. त्याच वेळी मणि यांनी मानव जातीच्या भल्यासाठी देवाकडे वरदान मागितले होते. त्यानंतर त्याला देवाने जिवंत सोडले होते.

खंडोबा हे अग्नी देवता असल्याचे म्हटले जाते. अग्नी देवतेच्या ही उग्र मानली जाते. त्यामुळे त्यांच्या पूजेचे नियमही खूप कडक आहेत. या देवतांना प्रसन्न करण्यासाठी काही वेळा त्यांना बकरीचे मांसही अर्पण केले जाते.
हे भव्य मंदिर दोन भागात विभागलेले आहे. त्यापैकी एकाला मंडप आणि दुस-याला गर्भगृह असं म्हणतात. इथे खंडोबाची मूर्ती बसवली आहे. हेमाडपंथी शैलीत बांधलेल्या या मंदिरात पितळेचे मोठे कासवही ठेवण्यात आले आहे.

याशिवाय या मंदिरात ऐतिहासिक दृष्टिकोनातून अनेक शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. तर दुसरीकडे दस-याच्या दिवशी दातांच्या साहाय्याने वजनदार तलवार लांब ठेवण्याची स्पर्धा असते, जी बरीच प्रसिद्ध आहे.
सोमवती अमावस्येला खंडेरायाची मोठी यात्रा असते. गेली २ वर्ष ही यात्रा कोरोनामुळे भरली नव्हती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मोठ्या उत्साहात यंदाची सोमवती यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या