कोल्हापूर : कोल्हापूर शहर परिसरात पावसाचा जोर नसला, तरी जिल्ह्यात होत असलेल्या दोन दिवसांच्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ झाली आहे.
दुसरीकडे धरणांच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होत आहे. पंचगंगेची पाणी पातळी साडे दहा फुटांवर पोहोचली आहे. कोल्हापूर शहरात पावसाचा लपंडाव सुरु असला, तरी जिल्ह्यात मात्र पावसाने जोर पकडला आहे.