18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रफडणवीसांचे आयुष्य स्वप्न बघण्यातच जावे

फडणवीसांचे आयुष्य स्वप्न बघण्यातच जावे

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपल्याच ओझ्याने कोसळणार, असा दावा भाजप नेत्यांकडून सातत्याने केला जातो. त्याला महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही प्रत्युत्तर दिले जाते. आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत एक वक्तव्य केलेय. लोकांचे प्रेम आणि नेत्यांची साथ यामुळे आपण अजूनही मुख्यमंत्री असल्याचे वाटते, असे फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या याच वक्तव्यावरून ‘अजुनी यौवनात मी’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

अजुनी यौवनात मी असे अनेकांना वाटते . हे नाटक रंगमंचावर फार गाजले. तसे अनेकांना वाटते की अजुनी यौवनात मी. मी अजूनही मुख्यमंत्री. आम्हालाही दिल्लीत गेल्यावर कधी कधी वाटते आमचा पंतप्रधान होणार. त्यांची भावना योग्य आहे. स्वप्नात रममाण व्हावे माणसाने, चांगली स्वप्ने पाहावीत. स्वप्नांना बळ असावे, त्यांच्या पंखांना ताकद यावी. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांचे आयुष्य स्वप्न बघण्यात जावे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या