27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रमाफियांना आता हिशेब द्यावा लागणार

माफियांना आता हिशेब द्यावा लागणार

एकमत ऑनलाईन

मुुंबई : संजय राऊत यांच्या घरी टाकण्यात आलेल्या ईडीच्या छाप्याचे किरीट सोमय्यांनी स्वागत केले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही धाड टाकली असल्याचे सांगण्यात येत आहे.

आज दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी करण्यात येईल. राऊतांवर करण्यात आलेल्या या कारवाईचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी स्वागत केले आहे. ‘‘माफिया संजय राऊत यांना आता हिशेब द्यावा लागणार’’, असे म्हणत सोमय्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

‘‘१२०० कोटी रुपयांचा पत्राचाळ घोटाळा असो, वसई नायगावमधील बिल्डरचा घोटाळा असो. महाविकास आघाडीचा महाराष्ट्र लुटण्याचा उद्योग सुरू होता. माफियागिरी, दादागिरी करत प्रत्येकाला जेलमध्ये पाठवण्याची धमकी देण्यात येत होती. आता या सगळयाचा हिशेब माफिया संजय राऊत यांना द्यावा लागणार,’’ असे म्हणत सोमय्यांनी राऊतांवर टीका केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या