मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड पुकारणारे आमदार आता वैतागले आहेत. त्यांना शिंदे यांना सोडून परत यायचे आहे. यामुळे ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे खासदार संजय राऊत सांगत आहे. बंड पुकारणारे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी भ्रमणध्वणीवर संपर्क साधला. यावेळी हॉटेलमधील जेवण पचत नाही परत या मी मध्यस्थी करतो असे चंद्रकांत खैरे भ्रमणध्वणीवर बोलताना म्हणाले.
शिवसेनेची बैठक पार पडल्यानंतर चंद्रकांत खैरे हे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना बंडखोर आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी संपर्क साधला आणि मदत मागितली. तसेच गुवाहाटीतून बाहेर काढण्याची विनंती केली. आमची मदत करा अशी विनंतीही बोरणारे यांनी खैरे यांना केली. तेव्हा त्यांनी सर्वांना मदत करणार नाही. आपल्या माणसांना मदत करणार असल्याचे सांगितले.
बाकीचे नाही तुम्ही कधी परत येता ते सांगा. मी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन जातो आणि मध्यस्थी करतो. हॉटेलमध्ये काय चालले आहे हे सर्व दिसत आहे. एकनाथ शिंदे एका व्हिडिओत वैतागलेले आम्हाला दिसले. तुम्ही लोक परत आल्यावर २० आमदार तरी शिवसेनेत परत येतील. किती दिवस हे चालणार आहे. हॉटेलमधील जेवण पचत नाही. हॉटेलचे खाऊन पोटात त्रास होते. परत या मी मध्यस्थी करतो, असे चंद्रकांत खैरे बोलताना बंड पुकारणारे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांना म्हणाले.