मुंबई : शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि त्यासाठी रेकी करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. हा हल्ला करणा-यांचा हेतू स्वच्छ नसल्याचाही निर्वाळा त्यांनी दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत आता एक ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, परवा साहेबांच्या घरी हल्ला झाला. हा हल्ला करणा-यांचा हेतू स्वछ नव्हता. त्यांनी साहेबांच्या घराची रेकी केली होती आणि त्यांना पवार साहेबांना शारीरिक इजा करायची होती. पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राचे नशीब की असे काही घडले नाही.
एसटी कर्मचा-यांनी केलेल्या आंदोलनानंतर राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादी पक्ष आंदोलक एसटी कर्मचा-यांच्या पाठीशी आहे, मात्र, चुकीच्या नेतृत्वाखाली पाठीशी नाही असेदेखील शरद पवार यांनी म्हटले आहे. नेता चुकीचा असेल तर, त्याचा परिणाम काय होतो, ते आज दिसले असा देखील पवार यांनी गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे.