पुणे : अनैतिक संबंधात अडथळा ठरणा-या तीन वर्षीय चिमुकलीचा आई आणि तिच्या प्रियकराने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. २ मार्चला खडकी पोलिसांना तीन वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला होता.
त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केल्याचे शवविच्छेदनातून समोर आले होते. पोलिसांनी या सगळ््या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि अखेर पोलिसानी याचा छडा लावला असून, निर्दयी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.