31.8 C
Latur
Saturday, April 1, 2023
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंच्या नावाची नोंद

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंच्या नावाची नोंद

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे गटनेते आणि प्रतोद हे पद रिक्त आहे. या पदावर एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादीचे गटनेते आणि अनिकेत तटकरे यांची पक्ष प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली. ही माहिती अजूनही अधिकृत संकेतस्थळावर दाखवण्यात येत आहे ही गंभीर चूक आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत सांगितले. आज विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर पॉईंट ऑफ प्रोसीजरनुसार जयंत पाटील यांनी ही चूक सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार एकनाथ खडसे असावे यासंदर्भात पक्षाच्यावतीने सभापतींना पत्र देण्यात आले आहे. याबाबतचे पत्र जयंत पाटील यांनी सभागृहात दाखवले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देशाचे पंतप्रधानाच बदलले आहेत. त्यामुळे माझ्याकडे असलेले पक्षाचे गटनेता पदही धोक्यात आले आहे असा टोलाही यावेळी जयंत पाटील यांनी लगावला.

नागालँडमध्ये रीओ हे सर्व पक्षाचा पाठिंबा घेतात, आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नवी पद्धत राज्यात सुरु केली आहे का? ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत असे वाटते असा मिश्किल टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या