21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रगावकरी पित असलेले पाणी पिण्यास नवनवीत राणांचा नकार

गावकरी पित असलेले पाणी पिण्यास नवनवीत राणांचा नकार

एकमत ऑनलाईन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट परिसरातील काही गावात उघड्या विहिरीतले दूषित पाणी प्यायल्याने २३१ जणांना अतिसाराची लागण झाली असून या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, खासदार नवनित राणा यांनी घटनास्थळी जात तेथिल परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, गावकरी पितात तेच पाणी त्यांना प्यायला दिले तेव्हा त्या संतापल्या. असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बाधित नागरिकांना दुषित पाण्यामळे कॉलराची लागण झाली आहे. त्यामुळे सर्व बाधितांची वैयक्तिक तपासणी करुन उपचार केले जात आहे.
अशातच राणा यांनी घटनास्थळी भेट दिली. दुषित विहीर पाहून त्यांनी नागरिकांना तुम्ही कधी फोन नाही केला की अशी समस्या आहे? असा सवाल उपस्थित केला. तेव्हा हे गाव वसल्यापासून येथिल नागरिक हेच पाणी पित आहेत. पण सरकारने लक्ष दिलेलं नाही. यावेळी त्यांनी इतर माहिती घेतली.

सरपंच फोन उचलत नाही अशी तक्रार गावक-यांनी राणा यांना केली. यावेळी राणा यांनी गावाचा सरपंच बदलण्याचे वक्तव्य केले. दरम्यान, एका सामाजिक कार्यकर्त्यांने राणा यांनी दुषित विहिरीतले पाणी राणा यांना पिण्यास दिले. त्यावेळी त्या संतापल्या.

सामाजीक कार्यकर्त्यांनी राणा यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. जेव्हा राणा यांना विहिरतले पाणी प्यायला दिले तेव्हा त्यांनी नकार दिला. ते काय फक्त हनुमान चालिसा वाचण्यासाठीच आहेत का? हनुमान चालिसा वाचून कोणत्या समस्या सुटत नाहीत असे ठणकावून सांगत जमिनीवर येऊन काम करा असा सल्ला गावक-यांनी यावेळी दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या