24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात १६ लाख रुग्ण कोरोनामुक्त रुग्णसंख्या घटली, ४ हजार ४९६ नवे रुग्ण

राज्यात १६ लाख रुग्ण कोरोनामुक्त रुग्णसंख्या घटली, ४ हजार ४९६ नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रात आतापर्यंत १६ लाख ५ हजार ६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील २४ तासांत ७ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.४४ टक्के झाला आहे.

आज राज्यात ४ हजार ४९६ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. मागील २४ तासांत १२२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.६३ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९६ लाख, ६४ हजार २७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ३६ हजार ३२९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला राज्यात ८४ हजार ६२७ अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. आज राज्यात ४ हजार ४९६ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १७ लाख ३६ हजार ३२९ इतकी झाली आहे.

देशात ९३ टक्के रुग्णांची कोरोनावर मात
देशात गेल्या २४ तासांत ४७ हजार ९०५ नवे रग्ण सापडले आहेत, तर ५५० बाधितांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कोरोनावर मात करणाºया रुग्णांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक असून, २४ तासांत ५२ हजार ७१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनावर मात करणाºया रुग्णांची संख्या ८० लाख ७० हजार ८१७ वर गेली असून, एकूण रुग्णसंख्या ८६ लाख ९० हजार ६२१ एवढी आहे. बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण दिलासादायक असल्याने आतापर्यंत एकूण ९३ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर आतापर्यंत १ लाख २८ हजार २०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

‘व्होटकटवा’ची बिहारी बोधकथा!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या