29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात आता कोरोना रुग्णसंख्या वाढणार नाही, तज्ज्ञांचे मत

राज्यात आता कोरोना रुग्णसंख्या वाढणार नाही, तज्ज्ञांचे मत

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येने कहर माजवला आहे. रोजची मोठी रुग्णवाढ, रेमेडिसीवरची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता आदी कारणांमुळे लोकांच्या मनात अक्षरक्ष: धडकी भरली आहे. मात्र अशातच दिलासा दायक बातमी समोर आली आहे. कानपूरमधील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढीचा वेग स्थिरावल्याने साथीने उच्चांक गाठला असावा. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत ही रुग्णवाढ स्थिरावून नंतर कमी होईल,असे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक मनिंदर अग्रवाल यांनी माहिती दिली. महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णवाढीने उच्चांक गाठल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांमधील आकडेवारीमधून तसेच चित्र दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत घट झाल्याचे तुम्हाला दिसून येईल,असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रामधील मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या शहरांमध्ये कोरोनाचा पिक आला आहे किंवा या शहरांमधील आकडेवारीची वाटचाल ही पिकच्या दिशेने होत आहे, अशी माहितीही अग्रवाल यांनी यावेळी दिली.

पुणे, मुंबईसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात रोज मोठी रुग्णसंख्या सापडत आहे. मृत्यूंच्या संख्येचेही मोठे प्रमाण आहे. मात्र सध्या नांदेड, जालना या जिल्ह्यात बरीच स्थिर रुग्णवाढ होत आहे. लातूरमध्ये मात्र मोठी वाढ होत आहे. त्यावरुन साधारणपणे नांदेड, जालना आदी जिल्ह्यांत काही दिवसांनी रुग्णसंख्येची उतरण होणे शक्य आहे. मात्र त्यासाठी नागरिकांनी कडेकोट नियम पालन केले पाहिजे.

उत्तरप्रदेशात पुढील आठवड्यात उच्चांक
छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही अपेक्षित रुग्णवाढ दिसून आली असून, ही वाढ अशीच होत राहिली तर पुढच्या आठवड्यात या राज्यांमध्ये कोरोनाचा उच्चांक गाठला जाऊन नंतर रुग्णसंख्या कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.

देशातही २५ एप्रिलनंतर संसर्गाला उतरण
देशामध्येही कोरोनाच्या रुग्णवाढीचा उच्चांक २५ एप्रिलपर्यंत गाठला जाईल. त्यानंतर ही रुग्णसंख्या कमी होईल, असा अंदाजही अग्रवाल यांनी वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांत देशातील कोरोना रुग्णांची संख्या चार पटींने वाढली. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दुपटीने वाढली. ही बाब महाराष्ट्रात कोरोनाचा पिक आला असल्याचे द्योतक आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना लवकरच मिळणार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या