मुंबई,दि.२५ (प्रतिनिधी) दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून आज राज्यात ६१५९ नवीन रुग्ण आढळून आले. तर ६५ रुग्णांचा मृत्यू झाला. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला होता. सप्टेंबरमध्ये राज्यात रोज २० ते २२ हजार नवे रुग्ण सापडत होते. हा आकडा नोव्हेंबरमध्ये तीन-सव्वातीन हजारांच्या टप्प्यात आला होता. तो आता पुन्हा वाढतो आहे. आज राज्यात ४८४४ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर ६,१५९ नवीन रुग्णांचे निदान झाले.
राज्यात आजपर्यंत एकूण एक कोटी चार लाख ५७ हजार लोकांची तपासणी करण्यात आली असून त्यातील १७ लाख ९६ हजार ( (१७.१७ टक्के) लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. आत्तापर्यंत १६ लाख ६३ हजार ७२३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.६४ टक्के झाले आहे.आज राज्यात आज ६५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.सध्या राज्यातील मृत्यूदर २.६० % एवढा असून आत्तापर्यंत राज्यात ४६ हजार ७४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ५,२९,३४४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये, तर ६,९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ८४ हजार ४६४ ऍक्टिव्ह रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
कचऱ्यावर प्रक्रियेचा असाही लातूर पॅटर्न, निम्म्या लातूर शहराच्या ओल्या कचऱ्यापासून बनतोय खत!