36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढली

पश्चिम महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढली

एकमत ऑनलाईन

पुणे : पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसभरात ५२७ ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ३९६, सातारा ७५, सोलापूर ३७, सांगली १० तर कोल्हापुरात ९ अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे़ त्याचप्रमाणे बरे होणा-या रुग्णांची संख्या एकूण ४५६ आहे. त्यामध्ये पुण्यात ३८१, सातारा २७, सोलापुरात २१, सांगली १३ व कोल्हापूर १४ असे प्रत्येक जिल्ह्यात रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितली. पश्चिम महाराष्ट्रातील एकूण ५ लाख ७८ हजार ३८३ रुग्ण बरे झाले आहेत.

तर रुग्णांची संख्या ६ लाख १ हजार ५३ झाली आहे. तर प्रत्यक्ष रुग्णसंख्या ६ हजार ४७९ इतकी आहे. एकूण १६ हजार १९१ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.६९ टक्के आहे. पश्चिम महाराष्ट्रात बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ९६.२३ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त राव म्हणाले. दरम्यान कोविड-१९ विरोधात लढण्यासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनसारख्या लसीकरणाच्या पुढील टप्प्यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्यापूर्वी अफवा, गैरसमज दूर करणे आवश्यक आहे आणि याकरिता आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन शंका दूर करणे अधिक फायद्याचे ठरेल असे जनरल फिजिशियन डॉ़ संजय नगरकर यांनी सांगितले़ ही लस जरी उपलब्ध करून देण्यात आली असली तरीसुद्धा ब-याचजणांना त्याच्या प्रभावीपणाबाबत शंका दिसून येते तसेच या लसीच्या दुष्परिणामांची चिंता दिसते. लसीच्या संदर्भात कोणतही निष्कर्ष काढण्याआधी डॉक्टरांशी नक्कीच चर्चा करा. त्यांचा सल्ला घ्या. मधुमेह, हृदयविकाराचा त्रास, दमा किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) सारख्या आजारांनी ग्रस्त आणि ६० वर्षांवरील व्यक्ती ज्यांना कॉमर्बिडिटीज आहेत त्यांनी न चुकता लसीकरण करून घ्यावे, असे ते म्हणाले.

 

शिव झेंड्याला सर्वाधिक मागणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या