26.9 C
Latur
Monday, July 4, 2022
Homeमहाराष्ट्रकामावर परतणा-यांची संख्या वाढली; एसटी पुन्हा धावणार असल्याची चिन्हे

कामावर परतणा-यांची संख्या वाढली; एसटी पुन्हा धावणार असल्याची चिन्हे

एकमत ऑनलाईन

मुंबई : हायकोर्टाच्या निर्देशानंतर आणि अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केल्यानंतर कामावर परतणा-या एसटी कर्माचा-यांची संख्या वाढू लागली आहे. यातील बहुतेकजण सदावर्तेंच्या अटकेनंतर रुजू झाले आहेत. मात्र, अटकेचा आणि कामावर रुजू होण्याचा संबंध नसल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. कर्मचारी पुन्हा कामावर रूजू होत असल्याने राज्यातील एसटी पुन्हा धावणार असल्याची चिन्हे आहेत.

एसटी कर्मचा-यांची बाजू हायकोर्टात मांडणारे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते आणि एसटी कर्मचा-यांना शरद पवार यांच्या घरावर आंदोलन केल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर कर्मचा-यांचा कामावर परतण्याचा ओघ वाढला असल्याचे दिसून येते. कामावर रुजू होणा-या एसटी कर्मचा-यांची संख्या ११ एप्रिलपर्यंत ४४ हजार ४३५ वर पोहचली आहे. येत्या काही दिवसांत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही कर्मचा-यांची नियुक्ती वैद्यकीय प्रमाणपत्रामुळे लांबली असल्याचे म्हटले जात आहे. बुधवार, गुरुवारपर्यंत कामावर परतणा-यांची संख्या ५० हजार होण्याचा अंदाज आहे.

एसटी कर्मचा-यांनी मागील पाच महिन्यांपासून संप पुकारला आहे. एसटीमध्ये सध्या २९३०३ चालक आणि २४६७० वाहक आहेत. त्यातील अनेकजण पुन्हा कामावर रुजू होत आहेत. त्यातील अनेकांची नियुक्ती वैद्यकीय कारणांनी लांबली आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाल्यानंतर हे कर्मचारी कामावर रुजू होणार आहे. हायकोर्टाने एसटी कर्मचा-यांना २२ एप्रिल पर्यंत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय, संपकरी एसटी कर्मचा-यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देशही राज्य सरकार, एसटी महामंडळाला देण्यात आले होते.

सदावर्तेंना स्वखुशीने पैसे दिले; कर्मचा-यांकडून घोषणा पत्र
एसटी कामगारांसाठी न्यायालयीन लढा देत त्यांचा नेतृत्व करणा-या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आम्ही स्वखुशीने प्रत्येकी तीनशे रुपये दिले होते, अशा आशयाचे एक घोषणा पत्र सध्या एसटी कर्मचा-यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर फिरत आहे. न्यायाधीशांना उद्देशून हे घोषणा पत्र असून त्याची प्रतिलिपि पोलीस अधिका-यांना आहे. हे घोषणापत्र कोणी तयार केले याबद्दल त्यात कुठलाही उल्लेख नसला तरी सदावर्ते यांना स्वखुषीने तीनशे रुपये दिल्याची घोषणा करणा-या कामगाराची स्वाक्षरी त्यामध्ये असावी अशा पद्धतीने हे घोषणापत्र तयार करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या