24.5 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home महाराष्ट्र कोणाच्या जाण्यानं पक्ष संपत नाही, पक्ष सोडताना कोणालातरी 'व्हिलन' ठरवावे लागते...

कोणाच्या जाण्यानं पक्ष संपत नाही, पक्ष सोडताना कोणालातरी ‘व्हिलन’ ठरवावे लागते ! -फडणवीसांचा पलटवार

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२१ (प्रतिनिधी) छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता असो किंवा मोठा नेता असो पक्ष सोडून गेल्यानंतर पक्षाचं थोडंफार नुकसान होतच असतं. परंतु भाजप हा मोठा पक्ष आहे. कोणाच्या येण्यानं व जाण्यानं पक्ष थांबत नाही, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना व्यक्त केली. पक्ष सोडताना कोणालातरी व्हिलन ठरवावे लागते त्यांनी मला करायचा प्रयत्न केला आहे, असं सांगताना फडणवीस यांनी खडसे यांचे आरोप फेटाळून लावले.

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या पाहणी दौऱ्यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलताना खडसे यांच्या राजीनाम्याबद्दल आपली भूमिका मांडली. खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर आपला भाजपवर रोष नाही, पण मला फडणवीसांनी छळले, मी त्यांच्यावर नाराज आहे. माझ्यावर झालेल्या आरोपामुळं व मानसिक छळामुळं मी पक्षांतराचा निर्णय घेतल्याचा आरोप केला होता. याबाबत विचारता ‘खडसे यांचे पक्ष सोडून जाणं दुर्देवी आहे. त्यांनी आपल्यावर केलेले आरोप खरे नाहीत. पक्ष सोडताना कोणालातरी व्हिलन ठरवावे लागते त्यांनी मला करायचा प्रयत्न केला, असल्याचे फडणवीस म्हणाले.

खडसेंच्या मनात माझ्याबद्दल काही अडचणी होत्या तर त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार करायला हवी होती. खडसे आज जे माझ्याबद्दल बोलत आहेत ते अर्धसत्य आहे. त्यामुळं योग्य वेळ आल्यावरच प्रतिक्रिया देईन, असे त्यांनी सांगितले. कोणाच्या येण्यानं व जाण्यानं पक्ष थांबत नसतो. जळगाव जिल्हा हा भाजपचा जिल्हा आहे. भाजप तिथं आधीपासूनच मजबूत आहे. तेथील जनतेचा भाजपवर विश्वास आहे. भाजपचे अजूनही काही आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं कोणी सांगत असले तरी भाजपातील कोणताही नेता राष्ट्रवादीत जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सेलूत गावठी पिस्टलसह काडतूस जप्त : दोघे जेरबंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या