34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeमहाराष्ट्रपक्षाने आमदारकी दिली; नेटाने काम कर - चित्रा वाघ

पक्षाने आमदारकी दिली; नेटाने काम कर – चित्रा वाघ

एकमत ऑनलाईन

मुंबई : सिंहाच्या तालमीत तयार झालेले वाघ आता केवळ नावापुरते उरले आहेत, अशी टीका करणाºया राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मिटकरी भावा, माझे आणि ‘माझ्या बापा’चे (राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार) यांचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार, अशा शब्दांत वाघ यांनी मिटकरींना सुनावले़

‘अमोल मिटकरी आता आला आहे. भावा माझ्या, तुला काय माहिती? पक्षाने तुला आमदारकी दिली आहे. नेटानं काम कर,’ असा सल्ला चित्रा वाघ यांनी दिला. ‘चांगला आवाज आहे. बोलत राहा. बाकी माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, ते बापालाच जाऊन विचार. साहेबांना विचार, ते तुला सांगतील,’ असे प्रत्युत्तर वाघ यांनी मिटकरींना दिले.

काय म्हणाले होते अमोल मिटकरी?
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी, या प्रकरणात गंभीर आरोप असलेल्या संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती. वाघ यांनी अतिशय आक्रमकपणे हा विषय लावून धरला. त्यावर मिटकरींनी ट्विट करत टोला लगावला. ‘वाघाची डरकाळी व्याघ्रवाड्यात अधिक उठावदार दिसत होती, पण कळपात गेल्यावर व्याघ्र डरकाळीसुद्धा हवेत कशी विरून जाते, हेही आज प्रत्यक्ष अनुभवले. शेवटी सिंहाच्या तालमीतील वाघ उरले केवळ नावापुरते,’ असे मिटकरींनी ट्विटमध्ये म्हटले होते.

सायबर ड्रॅगन जागा झाला!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या