29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रदोन फेक एन्काऊंटरचा होता प्लॅन; गूढ उलगडणार

दोन फेक एन्काऊंटरचा होता प्लॅन; गूढ उलगडणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी प्रकरण दाबण्यासाठी सचिन वाझे फेक एन्काऊंटर करण्याच्या तयारीत होते, अशी धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे. कारमायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी ठेवण्यात आली होती. सचिन वाझे या हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीची केस रफा दफा करण्यासाठी २ जणांचा एन्काऊंटर करून सर्व आरोप त्या दोन जणांवर टाकून या प्रकरणाला दहशतवादी रंग देणार होता, असा खुलासा तपासात झाला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली. त्यानंतर या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला होता. या संपूर्ण प्रकरणाने राज्याचे वातावरण ढवळून निघाले. मुख्यत: या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे याला एनआयएने अटक केली आहे. हे षडयंत्र कोणी रचले आणि हत्येमागे काय हेतू होता, इथपर्यंत एनआयएचा तपास पोहोचला आहे.

त्यातच आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली असून, स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरण दाबण्यासाठी सचिन वाझे फेक एन्काऊंटर करण्याच्या तयारीत होता. त्यासाठी इको कार चोरण्यात आली होती आणि त्या गाडीतूनच सचिन वाझे ४ मार्चला रात्री ७ च्या सुमारास भायखळा येथून ठाण्याला गेला होता. वाझेने मनसुख हिरेन यांना फोन करून घोडबंदर रोडवर बोलावले होते. तिथून त्याने एकूण ८ जणांना मनसुख यांचा ताबा ठाण्यातील माजीवडा सर्कल येथे दिला. त्यानंतर वाझे पुन्हा मुंबईला गेला आणि जिप्सी बारवर रेड केली आणि पंचनाम्याचा अधिकार नसतानाही रेड केली. त्यात काहीच सापडले नाही. तरीही पंचनामा केला. त्यामुळे मनसुख यांच्या हत्येच्या वेळेस वाझे मुंबईत होता, हे वाझेला दाखवायचे होते, अशी माहिती एनआयएला मिळाली आहे.

वाझेंच्या कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ
दरम्यान, सचिन वाझेच्या कोठडीची मुदत संपल्याने कोठडी वाढवून घेण्यासाठी आज सचिन वाझेला एनआयएच्या विशेष कोर्टात हजर केले होते. मिठी नदीतून मिळालेला सीसीटीव्ही डेटा आणि वाझेंच्या पासपोर्टची चौकशी करायची असल्याने वाझेंची कोठडी वाढवून मागण्यात आली. त्यानुसार त्याच्या एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तत्पूर्वी वाझेंचे वकील आणि एनआयएच्या वकिलांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला. यावेळी एनआयएच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आणि प्रकरणाचे गांभीर्य पाहून वाझेंच्या कोठडीत पाच दिवसाने वाढ केली.

राज्यात २७७ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या