27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeमहाराष्ट्रशेतकऱ्याच्या शेतात 2 कोटी 14 लाख रुपयांचा गांजा पाहून पोलिसही चक्रावले

शेतकऱ्याच्या शेतात 2 कोटी 14 लाख रुपयांचा गांजा पाहून पोलिसही चक्रावले

एकमत ऑनलाईन

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारात धुळे पोलिसांनी छापा टाकत सुमारे 2 कोटी 14 लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. आदिवारी शेतकऱ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्यानं पोलिसही हादरले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला याबाबत गोपनिय माहिती मिळाली होती. त्या आधारावर शिरपूर तालुका पोलिसांच्या मदतीनं सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

मिळालेली माहिती अशी की, शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान परिसरातील शिवारात मांगिलाल बारकु पावरा याच्या शेतात मोठ्या संख्येने अवैद्यरित्या गांजा साठवून ठेवला होता. यबाबत गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुंधवंत यांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपूर पोलिसांच्या मदतीने घटनास्थळावर छापा टाकला. यावेळी एका झोपडीत प्रति 30 किलो वजनाच्या गांजाच्या 128 गोण्या भरून ठेवलेल्या आढळून आल्या. यावेळी पोलिसांनी कारवाई करत सुमारे 3904 किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसांचा छापा पडताच संशयित मांगीलाल पावरा हा घटनास्थळावरून फरार झाला.

यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलिस अधीक्षक राजु भुजबळ, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभिषेक पाटील आदींनी घटनास्थळी भेट देवून पाहाणी केली.

दरम्यान, शिरपूर तालुक्यातील महाराष्ट्र व मद्य प्रदेश सीमा रेषेला लागून असलेल्या गाव पाड्यांसाह वन शिवारात नेहमीच स्पिरिट, भांग, गांजा, सारख्या अमली पदार्थांच्या तस्करी होत असते. हे आज झालेल्या कारवाईवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जप्त करण्यात आलेला गांजा हा काळ्या बाजारात सुमारे साडे पाच हजार किलो इतक्या दराने विकला जात असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.याप्रकरणी NDPS कायद्यान्वये शिरपूर तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस गांजा तस्करी प्रकरणी अधिक तपास करीत आहे.

Read More  व्यापारी महासंघानं 500 वस्तूंवर टाकला ‘बहिष्कार’

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या