29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रपोलिसांवर दबाव खपवून घेणार नाही

पोलिसांवर दबाव खपवून घेणार नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत काल रात्री पोलिस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब देखील विचारला. एवढच नाहीतर यादरम्यान भाजपा नेते आणि पोलिसांमध्येही शाब्दिक वाद झाले व यानंतर सर्वजण बीकेसीमधील पोलिस आयुक्तालयात पोहोचले असता, तेथील चर्चेनंतर अधिका-याला सोडण्यात आले. या सर्व घडामोडीमोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना, पोलिसांवर दबाव टाकणे योग्य नाही, या पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. असा विरोधी पक्षनेत्यांना इशारा दिला.

गृहमंत्री म्हणाले, पोलिसांना माहिती मिळाली की मुंबईत जवळपास ५० हजार रेमडेसिवीर येत आहेत. त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या संचालकांना पोलिसांनी काल पोलिस स्टेशनमध्ये बोलावले असता, त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व त्यांचे अन्य सहकारी त्या ठिकाणी पोहचले. यानंतर त्यांनी प्रश्न उपस्थित केला की या व्यक्तीला या ठिकाणी का व कशासाठी बोलावले गेले आहे.

जर एखाद्या प्रकरणात पोलिसांना चौकशी करावीशी वाटली तर पोलिस कोणालाही बोलावू शकतात, त्या दृष्टीने त्यांना बोलावण्यात आले होते. या ठिकाणी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. एकप्रकारे शासकीय कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी या निमित्त एवढेच सांगू इच्छितो अशाप्रकार पोलिसांवर दबाव टाकणे हे योग्य नाही. या दृष्टीकोनातून या पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत.

संचारबंदीत गुटखा व्यापारी जोमात प्रशासन कोमात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या