24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रराणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला

राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला

एकमत ऑनलाईन

मुंबई : राजद्रोहाच्या आरोपात अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याच्या अर्जावर आज मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, आजच्या सुनावणीत राणा पती-पत्नीला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर २९ एप्रिलपर्यंत राज्य सरकारने उत्तर द्यावे, त्यानंतर अर्जावर सुनावणी घेण्याची तारीख ठरवली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा कारागृहातील मुक्काम २९ एप्रिलपर्यंत वाढला आहे.

शनिवारपासून राणा दाम्पत्य हे कारागृहात असून राजद्रोहाच्या आरोपाखाली या पती-पत्नीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आता सत्र न्यायालयाने राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी २९ एप्रिलपर्यंतचा कालावधी दिला आहे. त्यामुळे २९ एप्रिलपर्यंत राणा दाम्पत्याला तुरुंगात रहावे लागणार आहे. दंडाधिकारी न्यायालयात त्यांची जामीन याचिका प्रलंबित आहे. कोणतीही कायदेशीर कार्यवाही न करता हे दाम्पत्य न्यायालयात आले असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आहे. त्यामुळे आता राणा पती-पत्नीच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरल्याने अटक झाल्यानंतर आता न्यायालयीन कोठडीत असलेले राणा दाम्पत्याचे राजद्रोहाच्या प्रकरणात जामिनासाठी प्रयत्न सुरू होते. राणा दाम्पत्याने राजद्रोहाच्या प्रकरणात जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज दंडाधिकारी कोर्टातील प्रलंबित जामिनाची याचिका मागे घेणार अशी माहिती मिळत होती. पोलिसांसोबत हुज्जत घातल्याच्या प्रकरणात एफआयआर रद्द करण्याची याचिका राणा दाम्पत्याने हायकोर्टात केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या