25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeमहाराष्ट्रतुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, आता राज्‍य मानवी हक्‍क आयोगाच्या आयुक्तपदाची जबाबदारी...

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, आता राज्‍य मानवी हक्‍क आयोगाच्या आयुक्तपदाची जबाबदारी !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१३(प्रतिनिधी) राज्‍य सरकारने अखेर अनेक महिन्यापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नेमणूक राज्य मानवी हक्क आयोगाच्या आयुक्तपदी केली आहे. तुकाराम मुंढे यांची ऑगस्ट २०२० मध्ये नागपूर महापालिका आयुक्तपदावरून बदली झाली होती. तेव्हापासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.मुंढे यांच्यासोबत एकूण चार अधिका-यांच्या बदल्‍या करण्यात आल्‍या आहेत.

राज्य सरकारने बुधवारी चार सनदी अधिकाऱ्यांच्या नव्या नेमणुकीचे आदेश जारी केले. त्यानुसार महाराष्ट्र पेट्रोकेमिकल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद कुमार यांची सहकार विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली झाली आहे.

२००७ च्या तुकडीचे अधिकारी डी. बी. गावडे यांची सार्वजनिक आरोग्य विभागात सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण जिवोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांची राज्य बालहक्क आयोगाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

बलात्काराचा आरोप, अनैतिक संबंधामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या