30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeमहाराष्ट्रशिल्लक डाळींचे लाभार्थ्यांना लवकरच वितरण

शिल्लक डाळींचे लाभार्थ्यांना लवकरच वितरण

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचे वाटप करण्यास केंद्र सरकारने गुरुवार दि़ १५ एप्रिल रोजी परवानगी दिली आहे. त्यानुसार शिल्लक डाळीचे लाभार्थींना लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचे वाटप केले नसल्याने त्या खराब झाल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर मंत्री भुजबळ यांनी खुलासा केला आहे.

भुजबळ म्हणाले, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत माहे एप्रिल ते नोव्हेंबर, २०२० या ८ महिन्यांच्या कालावधीमध्ये केंद्राने १,१३,०४२ मे.टन डाळींचे नियतन दिले होते. त्यापैकी १,०६,६०० मे.टन डाळींचे उपरोक्त ८ महिन्यांमध्ये वाटप करण्यात आहे. आजमितीस राज्य शासनाच्या गोदामांमध्ये व रास्त भाव दुकानांमध्ये एकूण ६,४४२ मे.टन डाळी शिल्लक आहेत. केंद्र शासनाशी दि़ २६/११/२०२० रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उपरोक्त ३ योजनांमध्ये काही प्रमाणात डाळी शिल्लक असून, त्यांच्या वितरणाबाबत केंद्र शासनाचे धोरण कळविण्याबाबत विचारणा करण्यात आली होती.

परंतु, केंद्र शासनाने त्यांचे धोरण राज्य शासनास कळविले नाही. त्यामुळे राज्य शासनाने पुन्हा पत्रान्वये शिल्लक राहिलेल्या डाळींची आकडेवारी केंद्र शासनास कळविली असता केंद्र शासनाने आज, दि. १५ एप्रिल २०२१ रोजी अन्न मंत्रालयाचे उपसंचालक संजय कौशिक यांच्या स्वाक्षरीने पत्रान्वये सदर शिल्लक डाळींचे वाटप राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना करण्याबाबत कळविले आहे.

गिफ्ट सेंटरच्या दुकानांत भाजीपाला; टाळेबंदीच्या काळात भाजी विक्रीचा आधार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या