29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रकामगारांचा पुन्हा परतीचा प्रवास

कामगारांचा पुन्हा परतीचा प्रवास

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली/मुंबई : राजधानी दिल्लीसह महाराष्ट्रात कोरोनाची तीव्रता वाढली असून, विविध राज्यांत कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने मुंबईसह विविध महानगरांत कामासाठी आलेल्या कामगारांनी आता परतीची वाट धरली आहे. या शहरांत बिहार, उत्तर प्रदेशातील कामगारांची संख्या अधिक आहे. तसेच राज्यातील ग्रामीण भागातीलही कामगार, मजूर आहेत. राज्यात पुन्हा लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली असून, राज्य सरकारने तसे संकेत दिल्याने मोठ्या संख्येने कामगारांनी परतीचा प्रवास सुरू केला असून, रेल्वे स्टेशन आणि बसस्थानकांवर गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशभरात लॉकडाऊन लागू केला होता. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. लॉकडाऊन किती दिवस राहणार, याचा अंदाज आला नसल्याने त्यावेळी अनेक कामगार, मजुरांनी मिळेल त्या वाहनाने आपल्या गावाची वाट धरली होती. मागचा अनुभव लक्षात घेता आता महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे, मुंबईसह विविध शहरांतील कामगारांनी आता आपल्या गावाची वाट धरली आहे. तसेच उत्तर प्रदेश, बिहारमध्ये मोठ्या संख्येने मजूर मिळेल ती वाहने, रेल्वेने जात आहेत. त्यामुळे बसस्थानकांसह वाहनांमधून गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच रेल्वे स्टेशनवरही प्रवाशांनी गर्दी केली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, सर्वांनी कोविडच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.

कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता लॉकडाऊन किती दिवस राहणार, याचा अंदाजच नसल्याने रोजी रोटीचा प्रश्न गंभीर बनू शकतो, अशी मजूर, कामगारांना चिंता आहे. मुळातच पहिल्या टप्प्यातील कोरोना नियंत्रणात आल्यानंतर अनेक जण पुन्हा कामाच्या ठिकाणी रूजू झाले होते. हाताला काम नसल्याने कामगार, मजूर मोठ्या संख्येने मुंबई, पुण्यात दाखल झाले होते. काही महिन्यांपूर्वीच स्थिर स्थावर झालेले असतानाच कोरोनाच्या दुस-या लाटेने देशात विशेषत: महाराष्ट्रात कहर केला आहे. त्यामुळे राज्य शासन किमान ८ दिवस लॉकडाऊन करण्याच्या मनस्थितीत आहे. त्यामुळे कामगारांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. मात्र, मागच्यावेळी रेल्वे बंद होत्या. यावेळी मोजक्या का असेना रेल्वे सुरू आहेत. त्यामुळे या कामगारांची सोय झाली आहे. विशेषत: परराज्यातील कामगार, मजुरांना परतीचा प्रवास सोपा झाला आहे.

मुंबईत रेल्वे स्टेशनवर गर्दी
राज्यातील इतर जिल्ह्यांसह मुंबईतही वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे गंभीर स्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. याच भीतीतून अनेक प्रवाशांनी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर मोठी गर्दी केली. या गर्दीमुळे ऐन वीकेंड लॉकडाऊनमध्ये प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. लोकमान्य टिळक टर्मिनसवर जमलेले अनेक प्रवासी विना तिकीट गावी जाण्यासाठी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळाले.

विकेंड लॉकडाऊनच्या घोषणेनंतर पलायन सुरू
महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा मोठा आहे. त्यामुळे मागच्या आठवड्यापासून राज्यात कडक निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होते की काय, अशा भीतीपोटी मुंबई, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी कामावर असलेले मजूर, कामगार पुन्हा धास्तावले असून, त्यांनी लगेचच परतीचा प्रवास सुरू केला असून, रोज बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर गर्दी होताना दिसत आहे.

बिहारने जारी केले मार्गदर्शक तत्त्वे
लॉकडाऊनच्या भीतीने महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने बिहारी मजूर, कामगार परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे बिहार सरकारने त्यांच्यासाठी खास मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच बिहार सरकारने विविध ठिकाणी प्रवाशांसाठी क्वारंटाईन सेंटर सुरू केले आहेत.

उस्मानाबादेत मृत्यूचे तांडव; एकाच ठिकाणी ८ मृतदेहांवर पालिकेकडून अंत्यसंस्कार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या