मुंबई/ पुणे : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी दिल्लीतील नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. मात्र उद्घाटनाच्या मुद्दयावरून मोठे नाराजीनाट्य दिसून आले विरोधकांनी सत्ताधा-यांवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कार्यक्रमावर तीव्र प्रतिक्रिया देत म्हणाले कीआज संसदेत पार पडलेले कार्यक्रम पाहून मी तेथे गेलो नाही याचे आणखी समाधान वाटत आहे.
सकाळी मी हा कार्यक्रम पाहिला. तो पाहिल्याच्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो नाही याचे आणखी मला समाधान वाटत आहे. त्याचे कारण ज्या लोकांची तिथे उपस्थिती होती आणि जे काही कर्मकांड सुरू होते ते पाहिल्यानंतर आधुनिक भारताची संकल्पना जी जवाहरलाल नेहरूंनी मांडली, ती आणि सध्या संसदेत जे सुरू आहे त्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही असे म्हणत या कर्मकांडाला गेले नाही याचे समाधान वाटल्याचे पवार म्हणाले.
१९ छोट्यामोठ्या पक्षांनी मिळून या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे दिसून आले. नवीन संसद भवन उभारताना विरोधकांना विचारात घेतले नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एरवी काम असले की मंत्री नेत्यांना फोन करता की नाही? जेव्हा विधेयक मंजूर करायचे असते, तेव्हा करता तसेच जर सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी, मंत्र्यांनी देशीतील सर्व विरोधी पक्षांना एखादा फोन जरी केला असता तर सर्व राजी खुशी गेले असते.
विरोधीपक्षाची भूमिका पवारांना माहिती : राम शिंदे
शरद पवार यांना संसदीय कामकाजाचा साठ वर्षांचा अनुभव आहे. या साठ वर्षांमध्ये त्यांनी अनेकदा सत्ता भोगली आहे. सत्तेमध्ये असताना विरोधी पक्षाची भूमिका काय असते आणि सत्ताधा-यांची भूमिका काय असते हे पवारसाहेब अतिशय चांगल्या पद्धतीने जाणतात. भाजप आमदार राम शिंदे यांनी शरद पवारांवर टीका केल्याचे दिसून आले.
लोकशाही विरोधीपक्षाविना अपूर्ण : सुळे
संविधानानी देश चालतो असे जेव्हा म्हणतो आणि ही लोकशाही असेल तर लोकशाहीमध्ये विरोधीपक्ष असलाच पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकारांचा देखील यासाठी आग्रह होता. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नसेल तर हा कार्यक्रम अपूर्ण आहे असे माझे मत आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सर्वसामान्य उपेक्षीतच : अनुमा आचार्य
गेल्या ९ वर्षात केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. महागाई, बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न, सुटले नाहीत अशी टीका काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या अनुमा आचार्य यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे. आजही अर्थव्यवस्था पूर्णपणे सक्षम झाली नाही. शेतक-यांचे उत्पन दुप्पट होणार असे जाहीर केले पण त्याची अंमलबजावणी झाली का? सामाजिक सदभाव किती आहे.