23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रअकरावीच्या प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज होणार जाहीर

अकरावीच्या प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज होणार जाहीर

एकमत ऑनलाईन

पुणे : इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी नियमित गुणवत्ता यादी शुक्रवारी(ता.१२) सकाळी दहा वाजता ऑनलाइनद्वारे जाहीर होणार आहे. पहिल्या यादीत पसंतीचे महाविद्यालय मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना दुस-या यादीत संधी मिळणार आहे. त्यामुळेच हजारो विद्यार्थ्यांचे लक्ष दुस-या फेरीतील प्रवेश यादीकडे लागले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील तीनशेहून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेतील दुस-या नियमित प्रवेश फेरीची प्रक्रिया सध्या सुरू असून त्याअंतर्गत गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर होत आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विद्यालय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. विद्यार्थी लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालय दर्शविण्यात येईल. तसेच, संबंधित कनिष्ठ महाविद्यालयास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालय लॉगिनमध्ये दर्शविण्यात येणार आहे. त्याशिवाय या दिवशी दुस-या नियमित फेरीचा कट-ऑफ पोर्टलवर जाहीर केला जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या