34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट आणखी गडद, दिवसभरात ९८५५ नवे रुग्ण, चिंता वाढली

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट आणखी गडद, दिवसभरात ९८५५ नवे रुग्ण, चिंता वाढली

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.३ (प्रतिनिधी) राज्यावरील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट अधिक गडद होत चालले आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाचे तब्बल ९८५५ नवे रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्णांची संख्या ८२ हजारांपुढे गेली आहे.

नियंत्रणात आलेल्या कोरोनाच्या संसर्गाने फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून पुन्हा डोके वर काढले आहे. आज राज्यात ९,८५५ नवीन रुग्ण आढळुम आले. तर ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज ६,५५९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. परंतु त्यापेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळून आल्याने उपचार सुरू असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ८२ हजार ३४३ झाली आहे. सध्या राज्यात ३ लाख ६० हजार ५०० व्यक्ती होमक्वारंटाईन, तर ३,७०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ९,८५५ नवीन रुग्णांची नोंद झाली. यात मुंबई-११२१, ठाणे-२४१, कल्याण-डोंबवली-२४६, नाशिक -५९३, पुणे-८५७, पिंपरी चिंचवड-४६१, औरंगाबाद-४४९ , अमरावती-४८३ व नागपूरमधील ९२४ रुग्णांचा समावेश आहे.

‘ब्लू इकॉनॉमी’चे फायदेशीर मॉडेल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या