27 C
Latur
Friday, February 26, 2021
Home महाराष्ट्र मुंबईकडे निघालेल्या शिवसेना आमदाराची वाट 'कोरोना'ने अडवली

मुंबईकडे निघालेल्या शिवसेना आमदाराची वाट ‘कोरोना’ने अडवली

एकमत ऑनलाईन

रायगड : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी मुंबईकडे निघालेल्या शिवसेना आमदाराची वाट ‘कोरोना’ने अडवली. रायगडमधील अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांना कोरोनाची लागण झाल्याचा मेसेज अर्ध्या वाटेत असताना आला.

पावसाळी अधिवेशन असल्याने महेंद्र दळवी कारने मुंबईला यायला निघाले होते. धरमतर खाडी पुलापर्यंत आले असताना दळवी यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल मेसेजद्वारे आला. महेंद्र दळवी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले.

कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच तात्काळ ते माघारी फिरले. कोणतीही लक्षणे नाहीत, मात्र खबरदारी म्हणून पुढील दहा दिवस आपण घरीच क्वारंटाईन राहणार असल्याने त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे संपर्कातील कार्यकर्त्यांना तपासणी करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

रिया चक्रवर्ती : सुशांत सिंग शुटींगवेळी तो ड्रग्स घेत होता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या