१७ जुलैपासून पावसाळी अधिवेशन
मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी संस्थगित झाले. पुढील पावसाळी अधिवेशन येत्या १७ जुलै रोजी मुंबईत सुरू होणार असल्याची घोषणा विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. विधिमंडळाचे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे होती. मात्र काही अपवाद वगळता कामकाज तसे शांततेत पार पडले.
शेतक-यांचा लाँग मार्च, सरकारी कर्मचा-यांचा बेमुदत संप अधिवेशन काळातच झाले. मात्र सरकारने ही आव्हाने परतवून लावली. पंचामृत अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. खा. संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग प्रस्ताव, राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून तसेच शिक्षेवरून सत्ताधारी तसेच विरोधक यांच्यात खडाजंगी उडालेली पाहायला मिळाली. शेवटच्या दिवशी विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घातल्याचेच दिसून आले.