20.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeमहाराष्ट्रलोकशाहीचा आत्मा भ्रष्ट झाला

लोकशाहीचा आत्मा भ्रष्ट झाला

एकमत ऑनलाईन

पुणे : सरकारने शिक्षणाची रूपरेषा तयार करून ती विद्यार्थ्यांवर थोपवली आहे. देशातील शिक्षण संस्थांमधून विद्यार्थी नाही तर प्रोडक्ट बाहेर पडत आहे. त्यामुळेच शिक्षणाची पद्धत पंगू बनत आहे. देशातील जवळपास सर्वंच शिक्षण संस्था या गुलाम बनल्या आहेत. येथील विद्यार्थी सुटाबुटात दिसतो पण चाणक्ष बुद्धिवान दिसत नाही. त्यामुळेच असे म्हणू शकतो की देशाचा आत्माच भ्रष्ट झालेला आहे.’’ असे विचार तुषार गांधी यांनी व्यक्त केले.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन ११ व्या भारतीय छात्र संसदेच्या सातव्या सत्रात ‘ सार्वजनिक संस्थांची पवित्रता कमी होणे तथ्य किंवा खोटेपणा’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.

यावेळी राज्यसभेचे खासदार जी.व्ही.एल नरसिम्हाराव, मध्ये प्रदेश येथील आमदार हिना कावरे, आमदार डॉ. संदीप सौरव आणि गौरव वल्लभ हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, रवींद्रनाथ पाटील आणि प्रा. परिमल सुधाकर हे उपस्थित होते.

यानंतर आमदार डॉ. संदीप सौरव, गौरव वल्लभ , हिना कावरे ,जी.व्ही.एल नरसिम्हाराव, विद्यार्थी प्रतिनिधी साक्षी बेले, रॉगर सोलेमन, रसिक रजा, धनंजय सोनावणे, सुभम गौतम यांनी आपले विचार मांडले. प्रा.डॉ. प्रशांत दवे यांनी स्वागतपर भाषण केले. प्रा. चयनिका बसू यांनी सूत्रसंचालन तर प्रा.डॉ. पोर्णिमा इनामदार यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या