20.8 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रराज्य सरकार कोर्टात जाणार

राज्य सरकार कोर्टात जाणार

एकमत ऑनलाईन

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडकपणे बोलण्याच्या शैलीसाठी ओळखले जातात. असाच काहीसा प्रकार शनिवारी बारामतीमध्ये पाहायला मिळाला. बारामतीमधल्या नियोजित कार्यक्रमांना अजित पवारांनी हजेरी लावली होती.

या वेळी बोलताना ते म्हणाले, जिल्हा बँक चालवण्याचा अधिकार केंद्र सरकारने जवळपास काढून घेतला असे अजित पवारांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने जिल्हा सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहेत. त्याच्या विरोधात राज्य सरकार कोर्टात जाणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. केंद्र सरकारने बरेच नवीन बदल केले आहेत. त्याकरता आम्ही कोर्टात जाणार आहोत. बँक चालवण्याचा जिल्ह्याचा अधिकार जवळपास काढून घेतला आहे. आम्ही चांगल्या पद्धतीने बँक चालवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या पाच बँकांमध्ये सातारा आणि पुणे जिल्हा बँक यांचा समावेश होतो. पण तरीदेखील सहकारी बँकांमधील अर्थव्यवस्था स्वत:च्या ताब्यात यावी अशा प्रकारचा केंद्राचा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्या विरोधात आम्ही चांगल्या वकिलाचा सल्ला घेऊन सहकार विभागाच्या वतीने पुढे कसे जायचे याचा विचार करीत आहोत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान त्यांनी खरेदी विक्री संघाच्या अधिकारी आणि पदाधिका-यांना सूचना देताना फटकारले आहे. तुम्ही मला कसलीही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा, असे अजित पवार पदाधिका-यांसह अधिका-यांना म्हणाले.

यावेळी पेट्रोलपंपाच्या परवानगीच्या कामात उशीर होत असल्याबद्दल कारण सांगण्यात आले. यावेळी अजित पवारांनी मला कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा. दिवाळीपूर्वी कामे पूर्ण करा, लागेल तिथे सहकार्य करू, अशा सूचना अजित पवार यांनी अधिका-यांसह पदाधिका-यांना दिल्या आहेत. ‘‘सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता इथे आहे. तुम्ही ना काही जण माझ्या गतीने कामे करा म्हणजे कामं होतील. ही काय पद्धत झाली? अधिका-यांना भेटा,’’ असे अजित पवारांनी म्हटले आहे.

उधारी धंदा नको
‘‘माझी व्यवस्थापकीय संचालकांना विनंती आहे की, माझी स्वत:ची गाडी जरी पेट्रोल-डिझेल भरायला आली तरी बिल द्यायचं. उधारी घ्यायची नाही. काहीही घ्यायला आलं तरी अजिबात उधारीचा धंदा नकोय आपल्याला,’’ अशी सूचना अजित पवार यांनी केली आहे.

तयारीला लागा
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. हाच मुद्दा पडकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या विचाराचे पॅनेल निवडुण आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागा. अवघे सात दिवस प्रचारासाठी मिळाले आहेत. सोमेश्वरचा ३ हजार ३०० रूपयांचा दर हा राज्यातील पहिल्या पाच कारखान्यामध्ये आहे. यापुढे कारखान्याची विस्तारवाढ करायची आहे. त्यामुळे आपल्या विचाराचे पॅनेल निवडूण येणे गरजेचे आहे असे पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या