26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रमध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकार डाटा देणार

मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकार डाटा देणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकारने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी इम्पिरिकल डाटा जून महिन्यात सादर करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे राज्यात ओबीसींसह निवडणुका होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशने जसा इम्पिरिकल डाटा सुप्रीम कोर्टात सादर केला, तशाच प्रकारे महाराष्ट्र सरकारही इम्पिरिकल डाटा तयार करून सुप्रीम कोर्टात सादर करणार आहे.

जयंत बांठिया आयोगाला या महिनाअखेरपर्यंत मध्य प्रदेशप्रमाणे इम्पिरिकल डाटा बनवून अहवाल सादर करण्यास राज्य सरकारने सांगितले आहे. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकार इम्पिरिकल डाटा सुप्रीम कोर्टाला सादर करणार, अशी शक्यता आहे. दरम्यानच्या कालावधीत कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर न करण्याची निवडणूक आयोगाकडे राज्य सरकारने विनंती केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या