25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeमहाराष्ट्रराज्याने ओलांडला १६ लाखांचा टप्पा

राज्याने ओलांडला १६ लाखांचा टप्पा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात आज १२५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, नवीन रुग्णसंख्येत विक्रमी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ९८४ नवीन रुग्णांची भर पडली़ तर त्याच्या साधारण तिप्पट १५ हजार ६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून ८६.४८ टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान, राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पावणे दोन लाखांच्याही खाली आली असून एकूण रुग्णसंख्येने १६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

राज्य कोरोना संसर्गाच्या संकटातून हळूहळू सावरत आहे. राज्यातील कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. आजच्या आकडेवारीतून त्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. विशेष म्हणजे सर्वच बाबतीत स्थिती सुधारताना दिसत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मृत्यूंचा आकडा सवाशेपर्यंत खाली आला आहे. राज्यात आज १२५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यात सर्वाधिक ४३ मृत्यू मुंबई पालिका हद्दीत झाले़ तर पुणे शहरात ८ मृत्यूंची नोंद झाली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परंडा तालुक्यातील आतिवृष्टीग्रस्त भागात पाहणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या