21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यावर अवकाळीचे संकट कायम

राज्यावर अवकाळीचे संकट कायम

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी गारपीटही झाली आहे. मात्र हे संकट अद्याप संपलेले नसून आणखी ५ दिवस अवकाळी पावसासह गारपिटीचीही शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. रोजच्याच पावसामुळे राज्यात सरासरी तापमानात काहीशी घसरण झाली आहे. शेतक-यांसही सामान्य जनतेपुढे चिंता निर्माण करणा-या पावसाचा मुक्काम आणखी काही दिवस लांबणार आहे. पुढील पाच दिवस संपूर्ण भारतात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार असल्याची माहिती भारतीय वेधशाळेने दिली आहे.

महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासोबत वेगवान वा-याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता आहे.काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते, असे मुंबई वेधशाळेने सांगितले आहे. पाऊस सुरू असताना अथवा आकाशात विजा चमकत असताना, घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या